नेट मीटरिंग पॉलिसीमुळे सौर ऊर्जेचा वापर आर्थिकदृष्ट्या सोयीस्कर ; ऊर्जा व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास सौर पॉवर प्लांट द्वारे खर्च व ऊर्जेची बचत शक्य – श्री. सारंग गरुड, सहयोगी उपाध्यक्ष, सनशॉट टेक्नॉलॉजी लि.

निमा व सनशॉट टेक्नॉलॉजी लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सोलर मास्टर क्लास बाय सनशॉट’ कार्यशाळेत बोलतांना सनशॉट टेक्नॉलॉजीचे सहयोगी उपाध्यक्ष सारंग गरुड यांचे प्रतिपादन
————————————-
रुफटॉप सोलर प्रणालीद्वारे ऊर्जा निर्मिती करतांना कॅपेक्स मॉडल व ऑपेक्स मॉडेल चा अवलंब केला जातो. कॅपेक्स मॉडेल चा अवलंब कमी प्रमाणात होतो कारण त्यात भांडवली गुंतवणूक ग्राहकालाच करावी लागते व तीदेखील मोठी लागते. ऑपेक्स मॉडेलद्वारे ‘पॉवर ऑन युनिट बेसिस’ वर म्हणजे ऊर्जेच्या वापरानुसार शुल्क द्यावे लागते व अंतिम ग्राहकाला ऊर्जा उपलब्ध होते. ते निमा व सनशॉट टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ ऑगस्ट २०१९ रोजी हॉटेल बीएलव्हिडी, सातपूर येथे आयोजित ‘सोलर मास्टर क्लास बाय सनशॉट’ कार्यशाळेत बोलत होते. पॅनल एफिशियंसी व ऊर्जा निर्मितीच्या बाबतीत शॅडो अनॅलिसिसचे महत्व देखील त्यांनी विशद केले. महाराष्ट्र शासनाचे रुफटॉप सोलर संदर्भातील धोरण विशद करतांना नेट मीटरिंग पॉलिसीची माहिती दिली. नेट मीटरिंग पॉलिसीमुळे सौर ऊर्जेचा वापर आर्थिकदृष्ट्या सुकर झाला असून ऊर्जा व्यवस्थापन व्यवस्थित केल्यास सौर पॉवर प्लांट द्वारे खर्च व ऊर्जेची बचत शक्य होत असल्याची माहिती श्री. गरुड यांनी दिली. सनशॉट टेक्नॉलॉजी लि. चे सध्यस्थितीत सुरु असलेल्या प्रकल्पांचे यश तसेच विविध उत्पादनांची माहितीदेखील त्यांनी यावेळेस दिली.

यावेळी व्यासपीठावर निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, निमा सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर, सनशॉट टेक्नॉलॉजीचे सहयोगी उपाध्यक्ष सारंग गरुड व मार्केटिंग हेड नीरज जैन यांची उपस्थिती होती.

निमा सेमिनार समितीचे अध्यक्ष गौरव धारकर यांनी प्रास्ताविक करत उपस्थितांचे स्वागत केले.
निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी निमाच्या कार्याची थोडक्यात माहिती देत वरील कार्यक्रमाच्या आयोजनाच उद्देश स्पष्ट केला

कार्यक्रमाच्या अखेरीस प्रश्नोत्तरांच्या सत्रात श्री. गरुड यांनी उपस्थितांच्या प्रश्न व शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी निमा दिंडोरीचे अतिरिक्त उपाध्यक्ष संजय सोनवणे, निमा सिन्नरचे अतिरिक्त सचिव संदीप भदाणे, कार्यकारिणी सदस्य राजेंद्र जाधव, हर्षद ब्राह्मणकर, सौ. नीलिमा पाटील, अखिल राठी, राजेश गडाख, सदस्य अनिल बाविस्कर व अन्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभारप्रदर्शन सनशॉट टेक्नॉलॉजीचे मार्केटिंग हेड नीरज जैन यांनी केले